Home महाराष्ट्र दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं

आत्महत्या घटना: आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेतला आणि यात आईसह दोन्ही निरागस बालकांचा मृत्यू झाल्याची घटना.

Suicide Case Mother also killed herself by poisoning the two little ones

यवतमाळ:  आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेतला आणि यात आईसह दोन्ही निरागस बालकांचा मृत्यू झाल्याची घटना  घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली.  रेश्मा नितीन मुडे (28) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन मुडे (6) आणि सार्थक नितीन मुडे (3) असे या चिमुकल्यांचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

14 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारास रेश्मा मुडे यांनी आपल्या निरागस बालकांना आधी विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. काही वेळानंतर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली. त्यावेळी त्यांनी लगेचच आई रेश्मा आणि सार्थक, श्रावणी या तिघांनाही तातडीने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नेमकं रेशमाने अचानकपणे आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. दरम्यान महागाव पोलीस ठाण्यात आई रेश्मा नितीन मुडे आणि सार्थक मुंडे,  यांच्या मृत्यूप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आला. तर श्रावणीचा मृत्यू पुसद येथील दवाखान्यात झाला त्यामुळे तिचा मृत्यूची नोंद पुसद पोलिसांनी घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान उमरखेड महागाव आणि पुसद येथील पोलीस विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Web Title: Suicide Case Mother also killed herself by poisoning the two little ones

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here