Home Accident News ट्रक दुचाकीचा  भीषण अपघात, पती, पत्नीसह  मुलाचा मृत्यू

ट्रक दुचाकीचा  भीषण अपघात, पती, पत्नीसह  मुलाचा मृत्यू

Accident: भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने  भीषण अपघात, तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

accident of truck and two-wheeler, death of husband, wife and child

दौंड:  दौंड तालुक्यातील  पाटस-कुसेगाव मार्गावर पाटस हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने  भीषण अपघात झाला. या अपघातात  दुचाकीवरील पती, पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे.  तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 
संतोष सदाशिव साबळे ,रोहिणी संतोष साबळे ,गुरु संतोष साबळे ( पाटस ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने पाटस परिसरात शोककळा पसरली आहे.

पाटस ते कुसेगाव जाणाऱ्या रोडवर कारखान्याजवळ अपघात झाला आहे. एकाच घरातील आई वडील आणि मुलाचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. तिघेही कुसेगावकडून पाटसच्या दिशेने दुचाकीने जात होते. त्यावेळी पाठीमागून येणार्‍या ट्रकने त्यांना धडक  दिल्याने अपघात होऊन आई आणि वडिलांचा जागेवर मृत्यू झाला असून मुलाचा रुग्णालयात नेताच मृत्यू झाला आहे.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

आज दुपारी साडेबाराच्या हा  अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. माहीती मिळताच पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सगळ्या अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे.

Web Title: accident of truck and two-wheeler, death of husband, wife, and child

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here