Home Accident News समृध्दी महामार्गावर ट्रक पुलावरून कोसळून भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

समृध्दी महामार्गावर ट्रक पुलावरून कोसळून भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway Accident:  ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून 15 फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहक गंभीर जखमी.

accident on Samruddhi highway after truck fell from bridge, driver died on the spot

अमरावती: राज्याच्या विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात वाहतुकीच्या दृष्टीने मात्र असुरक्षित ठरत असून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज पहाटे पुन्हा भीषण अपघात झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगातील ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक 15 फूट खाली कोसळला. अपघात एवढा भीषण होता की ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, तारेने भरलेला हा ट्रक नागपूरवरून मुंबईकडे जात असताना सकाळी 6 वाजता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेदुरजना खुर्द दरम्यान हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून 15 फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहक गंभीर जखमी झाला.

आशिष तिवारी असे मयत चालकाचे नाव आहे, तर संतोष केवट असे गंभीर जखमी वाहकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: accident on Samruddhi highway after truck fell from bridge, driver died on the spot

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here