Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: सरबत पिण्यातून विषबाधा; दोन चिमुकल्‍यांचा मृत्‍यू

अहमदनगर ब्रेकिंग: सरबत पिण्यातून विषबाधा; दोन चिमुकल्‍यांचा मृत्‍यू

Ahmednagar News:  शेतकरी कुटूंबातील तिघा मुलांना घरच्याच खाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन चिमुकल्‍यांचा दुर्देवी मृत्‍यू (Death) झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक.

Poisoning by drinking syrup Death of two toddlers

अहमदनगर : टाकळी काझी (ता. अहमदनगर) येथील शेतकरी कुटूंबातील तिघा मुलांना घरच्याच खाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली. यात दोन चिमुकल्‍यांचा दुर्देवी मृत्‍यू झाला आहे. तर एकाची प्रकृती देखील चिंताजनक असून त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर तालुक्यातील टाकळी काझी या गावातील ही दुर्देवी घटना समोर आली आहे. शेतकरी कुटूंब असलेल्‍या बापू म्‍हस्‍के हे परिवारासोबत वास्‍तव्‍यास आहेत. तिन्ही मुलांनी ७ मार्चला सरबत करून पिल्याचे सांगितले. ज्‍यूस पिल्‍याने मुलांना यातून विषबाधा झाली. ८ मार्चला सकाळी शिवराज म्‍हस्‍के यास उलट्या झाल्याने त्याचा लागलीच मृत्यू झाला. मुलांना त्रास होवू लागल्‍याने त्‍यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

शिवराज यास उलट्या झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्वराज व सार्थक यांनाही उलट्या होऊ लागल्याने त्यांना नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्‍यान रात्री ८ च्या दरम्यान स्वराज बाप्पू म्हस्के (वय १४ महिने) याचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर सार्थक भाउसाहेब म्हस्के (वय १४) याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तालुका पोलीस स्टेशनचे भानुदास सोनवणे यांनी पंचनामा केला.

Web Title: Poisoning by drinking syrup Death of two toddlers

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here