समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, आई-वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
Ahmednagar News: समृद्धी महामार्ग सातत्याने अपघातांमुळे चर्चेत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात १८ महिन्यांची चिमुकली तिचे आई आणि वडिल असे एकाच कुटुंबातील तीन लोक ठार.
कोपरगाव | Kopargaon: राज्यातला मोठा महामार्ग अशी ख्याती असलेला समृद्धी महामार्ग सातत्याने अपघातांमुळे चर्चेत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या आयशरला क्रुझर गाडीने धडक दिली. झालेल्या अपघातात १८ महिन्यांची चिमुकली तिचे आई आणि वडिल असे एकाच कुटुंबातील तीन लोक ठार झाले आहेत. सदरचे कुटुंब नेर येथून विरार येथे जात असताना हा अपघात झाला आहे. तसेच अन्य सात जण या अपघातात जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोकमठान शिवारात समृध्दी महामार्गावर आज रात्री सव्वा वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या आयशरला क्रुझर गाडीने धडक दिली. या धडकेत क्रुझर मधील संतोष अशोक राठोड (वय ३०), अवनी संतोष राठोड (वय १८ महिने) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर वर्षा संतोष राठोड (वय २७) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हे सर्व जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नेर येथी रहिवासी आहे. तर या अपघातात क्रूझर मधील सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर मृतदेह अमित खोकले व रफिक पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून अधिक तपास शहर पोलिस करत आहे.
Web Title: accident on Samrudhi Highway, 18 month old girl died along with her parents
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App