संगमनेर: पायी जाणाऱ्या एकास दुचाकीने धडक दिल्याने जखमी, गुन्हा दाखल Accident
Sangamner Accident: अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध शुक्रवारी (दि. २९) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
संगमनेर : दुचाकीच्या धडकेत पायी जाणारी वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २१) सकाळी साडेदहाच्या सुमारास विठ्ठल मंदिराजवळ घडली होती.
याप्रकरणी अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध शुक्रवारी (दि. २९) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत धोंडिबा गायकवाड (वय ७५, रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा दशरथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कूटी (क्र. एमएच १७ सीडी २६२८) चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक डी. सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Accident pedestrian injured after being hit by a bike