Home Accident News ब्रेकिंग: शाळेची बस दरीत कोसळली, ४४ विद्यार्थी जखमी

ब्रेकिंग: शाळेची बस दरीत कोसळली, ४४ विद्यार्थी जखमी

School Bus Accident: आयुका दुर्बीण पाहण्यासाठी आलेली शाळेची बस दरीत कोसळली.

Accident School bus falls into valley, 44 students injured

पुणे: आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगावच्या शाळेची बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल ४४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुक्ताई प्रशाला पिंपळगाव शाळेचे विद्यार्थी गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रवासात शाळेची बस दरीत कोसळली. बसमध्ये ४४ विद्यार्थी आणि तीन शिक्षक होते. बचाव पथकाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. आणि सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यामधील सर्वांना ॲम्बुलन्स द्वारे सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तर ४ मुलांना मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्वांवर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Accident School bus falls into valley, 44 students injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here