Home Accident News दुर्दैवी घटना: शाळकरी मुलाचा विजेचा शाँक लागुन मृत्यु

दुर्दैवी घटना: शाळकरी मुलाचा विजेचा शाँक लागुन मृत्यु

Accident Schoolboy dies after electric shock

पाथर्डी |Accident| Pathardi: शेतामधे म्हैस चारण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा विजेचा शाँक लागुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यताील मुंगुसवाडे येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.  राम नारायण हिंगे (वय 13) असे या मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी दुपारी मुंगुसवाडे येथील राम हिंगे हा शाळेत न जाता तो म्हैस चारण्यासाठी शेतात गेला होता. तेथे विजपंपासाठी विजपुरवठा घेतलेल्या केबलला त्याचा हात लागून विजेचा शाँक बसला.

यामध्ये राम जखमी झाला. त्याला उपचारासाठी खरवंडी येथील रूग्णालयात हलवण्यात आले मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एक वर्षापुर्वीच राम याची आई व बहीण दोघीही विहरीत पडुन मरण पावल्या होत्या. आणि आता त्याच ठिकाणी कुटूंबामधील एकुलता एक मुलाचाही विजेला चिकटुन मुत्यु झाल्याने मुंगुस्वाडे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accident Schoolboy dies after electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here