Home लाइफस्टाइल सायबर सुरक्षित होण्यासाठी आपण या १० गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे

सायबर सुरक्षित होण्यासाठी आपण या १० गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे

cyber safety tips for students and parents

Cyber Safety Tips for Students and Parents:

मुलं ओनलाइन शिक्षण घेत आहेत. क्लासेस ओनलाइन सुरु आहेत. वर्क फ्रॉम होम सुरु आहे.  बँकिंग, शॉपिंग, सोशियल नेट्वर्किंगपर्यंत सर्वच गोष्टी आपण ओनलाइन करतो आहोत. अशा वेळी आपल्या कुटुंबाचा सायबर वावर सुरक्षित असला पाहिजे. याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सुरक्षित होऊ शकतो. त्यासाठी आम्ही काही cyber safety tips for students आणि cyber safety tips for Parents साठी घेऊन आलो आहेत,

 • आपल्या इन्टरनेट व मोबाईल बँकिंगचा पासवर्ड, इमेल्स आणि सोशियल मेडीयाचा पासवर्ड विचित्र असायला हवा. तो जितका विचित्र तितका उत्तम . यामध्ये आपल्या कुटुंबियाचा वाढदिवस, नाव, तारखा नकोत.
 • सद्यस्थितीत Two Way Authention ची सोय असते. म्हणजेच पासवर्ड टाकल्यानंतरही अजून एक टप्पा असतो. ज्यात अजून एकदा पासवर्ड किंवा ओटीपी असतो. जो टाकून प्रोफाईल उघडता येते. अशा सोप्या सोयी सुरक्षेसाठी वापरल्या पाहिजेत.
 • पासवर्ड वरचेवर बदलला गेला पाहिजे.
 • संगणक व मोबाईलमध्ये Anti Virus प्रोग्राम असायला हवा. अनेकदा मोबाईलमध्ये वापरला जात नाही. आणि मोबाईल हॅक होतो. त्यामुळे मोबाईल मध्ये हा प्रोग्राम हवाच.
 • कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी लिंक मध्ये व्हायरस असू शकतो. तसेच अनोळखी आणि पूर्व कल्पना ना दिलेला विडीयो कॉल उचलू नका.
 • समजा तुमच अकाऊंट हॅक झाले असेल तर तुमच्या मित्रांना व मैत्रीणीना तशी कल्पना द्या जेणे करून तुमच्या प्रोफाईल वरून आलेल्या लिंकवर क्लिक करणार नाही.
 • आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर कोणालाही शेअर करू नका.
 • इंटरनेट कॅफे मध्ये सोशियल मेडीया वापरत असाल तर तेथून लॉगआउट व्हा. संगणकाची हिस्ट्री डिलीट करा. काही डाऊनलोड केले असेल तर ते डिलीट करा.
 • तुमच्याबाबतीत काही सायबर गुन्हा घडला असेल तर ताबोडतोब सायबर पोलिसांची मदत घ्या. गप्प राहू नका. गप्प राहिल्याने त्रास वाढतो. पण संपत नाही हे लक्षात ठेवा.
 • अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कॉलबळी पडू नका. मोफत कमी पैशात काही गोष्टी समोरची व्यक्ती ऑफर करीत असेल तर संपूर्ण खात्री केल्याशिवाय बळी पडू नका.  
 • See also: Jokes in Hindi 
 • See also: Marriage Anniversary Wishes in Marathi

Web Title: cyber safety tips for students and parents

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here