Home अहमदनगर Ahmednagar: करूणा धनंजय मुंडेंकडून नव्या पक्षाची घोषणा

Ahmednagar: करूणा धनंजय मुंडेंकडून नव्या पक्षाची घोषणा

Ahmednagar Karuna Dhananjay Munde announces new party

अहमदनगर | Ahmednagar:  करुणा धनंजय मुंडे यांनी शिवशक्ती सेना या  नव्या पक्षाची घोषणा अहमदनगरमध्ये केली. करुणा मुंडे या राज्यात सामाजिक कार्यात कार्यरत होत्या. राज्यात सामाजिक कार्य करत असताना असे लक्षात आले की, राज्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी समाजासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

करूणा मुंडे यांनी आज अहमदनगर मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाऊसाहेब शिंदे, रवी गवळी, दादासाहेब जावळे, भारत भोसले आदी उपस्थित होते. यावेळी करूना मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होत आहे. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करत असतो. हा सर्व भ्रष्टाचार कोठेतरी थांबवायचा आहे.  त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणाही मुंडे यांनी केली. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी 25 वर्ष पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Web Title: Ahmednagar Karuna Dhananjay Munde announces new party

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here