Home महाराष्ट्र Accident: ऊसाच्या ट्रॅक्‍टरखाली चिरडून शाळकरी मुलीचा मृत्यू

Accident: ऊसाच्या ट्रॅक्‍टरखाली चिरडून शाळकरी मुलीचा मृत्यू

Accident Schoolgirl dies after being crushed under sugarcane tractor

शिरूर: करंदी येथील वर्पे वस्ती येथून जातेगाव येथे शाळेमध्ये चाललेल्या मुलींच्या दुचाकीला ऊसाच्या ट्रॅक्‍टरची धडक बसल्याने अपघात (Accident) घडला. या अपघातात कीर्ती भगवान वाडेकर (वय 17, रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) हिचा जागीच मृत्यू झाला. तसेच वेदांती प्रवीण निकम (वय 17, रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) ही गंभीर जखमी झाली. याबाबत अशोक गुलाबराव वाडेकर (रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी ट्रॅक्‍टर चालक विशाल पंढरीनाथ मारणे (रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर येथील करंदी-जातेगाव रस्त्याने कीर्ती भगवान वाडेकर व वेदांती प्रवीण निकम या दोघी त्यांच्या (एमएच 12 टीएक्‍स 3462) दुचाकीहून जातेगाव बुद्रुक येथील शाळेमध्ये चाललेल्या होत्या. करंदी-जातेगाव रस्त्याने वर्पे वस्ती येथे (एमएच 12 – 3662) ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर चालक वेडेवाकड्या पद्धतीने ट्रॅक्‍टर चालवत असताना शाळेमध्ये जाणाऱ्या मुली ट्रॅक्‍टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा शाळकरी मुलीच्या दुचाकीला धक्का लागला. यावेळी कीर्ती वाडेकर व वेदांती निकम या दोघी खाली पडल्या त्याच वेळी ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचे चाक कीर्ती वाडेकर हिच्या छातीवरून तसेच वेदांती निकम हिच्या दोन्ही पायांवरून गेले. अधिक तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Accident Schoolgirl dies after being crushed under sugarcane tractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here