Home Accident News संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका रस्ता दुभाजकावर धडकल्याने पलटी

संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका रस्ता दुभाजकावर धडकल्याने पलटी

Sangamner Accident News:  भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका रस्ता दुभाजकावर धडकल्याने पलटी झाल्याची घटना.

Accident speeding ambulance overturned after hitting a road divider

संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका रस्ता दुभाजकावर धडकल्याने पलटी  झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील दिल्ली नाका परिसरात घडली.

नाशिक – पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात झालेल्या अपघातातील जखमींना आणण्यासाठी शहरातील कुटे हॉस्पिटलची रुग्णवाहिका रात्री अकरा वाजेच्या सुमारास निघाली होती. ही रुग्णवाहिका भरधाव वेगाने जात होती. दिल्ली नाका परिसरातील वळणावर असलेल्या रस्ता दुभाजकावर रुग्णवाहिका धडकली. यामुळे रुग्णवाहिका पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. दिल्ली नाका परिसरातील युवकांनी रुग्णवाहिका उभी करून रस्त्याच्या बाजूला लावली.

संगमनेर  शहरातील विविध रुग्णालयांच्या रुग्णवाहिका भरधाव वेगाने जात असतात. यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. या रुग्णवाहिका नियमबाह्य पद्धतीने चालवले जातात. पोलिसांनी याबाबत नियंत्रण आणावे असे मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Accident speeding ambulance overturned after hitting a road divider

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here