Home क्राईम धक्कादायक! बलात्कार करून काढले विवाहित महिलेचे न्यूड फोटो अन…

धक्कादायक! बलात्कार करून काढले विवाहित महिलेचे न्यूड फोटो अन…

Pimpari Crime: विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन बलात्कार (Rape).

Nude photos of a married woman after being rape

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. ३१ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरार आहे. त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

अधिक माहितीनुसार,  ३२ वर्षीय महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. आर्थिक अडचण आहे, असे म्हणून पीडित महिलेकडून त्याने पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोन्याचे दागिने घेतले.

आरोपीने पीडित विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. न्यूड फोटो काढून पीडित महिलेला धमकवण्यात आले. कालांतराने पीडित महिला फोन उचलत नसल्याने न्यूड फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवीन, असे म्हणून पुन्हा धमकी दिली. तसेच, पीडित महिलेच्या भावाला फोन करून आरोपीने अश्लील शिवीगाळ करण्यात आली. पीडित महिलेच्या वाॅट्सॲप फॅमिली ग्रुपवर बदनामीकारक मॅसेज केला. या सर्व घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपीचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

Web Title: Nude photos of a married woman after being rape

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here