Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: एसटी बसची स्कूटरला धडक, एक ठार- Accident

अहमदनगर ब्रेकिंग: एसटी बसची स्कूटरला धडक, एक ठार- Accident

Parner Accident News: एसटी बसची स्कूटरला धडक बसल्याने भीषण अपघात.

Accident ST bus collides with scooter, one killed

पारनेर: अहमदनगर पुणे महामार्गावर पवारवाडी घाटात एसटी बसची स्कूटरला धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटर चालक ठार झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि 15 ऑगस्ट 2022 रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा येथील पवारवाडी घाटातील पहिल्या वळणावर अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेली शेवगाव- पुणे एसटी बस क्रमांक एमएच 14 बीटी 4879 या बसने याच गाडीच्या पुढे चालत आसलेल्या स्कुटरला धडक (Accident) दिली. यात स्कुटर चालक दिनेश महेश दाने (रा.भुषण नगर केडगाव अहमदनगर) हे डांबरी रोडवर जोरात पडले त्यात त्यांना जबर मार लागला. नागरिकांनी जखमी दिनेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित केले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी पोलीस व त्याचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुपा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Accident ST bus collides with scooter, one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here