Akole News: प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन.
अकोले: भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणातुन दि. १६/०८/२०२२ रोजी सायंकाळी ६:०० वा. १०२१९ क्युसेक्स व निळवंडे धरणातुन १६७१८ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवरा नदीकाठच्या गावांना जाहीर आवाहानाद्वारे सूचित करण्यात आले की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु, वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
Web Title: increased from Pravara riverbed, alert warning