Home Accident News भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले चार जण जागीच ठार

भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले चार जण जागीच ठार

Accident News:  भरधाव पिकअप टॅम्पोने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाल्याची घटना.

Accident The bike and fast tempo Four people died on the Spot

लातूर: कळंबकडून लातूरच्या दिशेने शिमला मिरची घेऊन निघालेल्या भरधाव पिकअप टॅम्पोने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना लातूर तालुक्यातील जोडजवळा परिसरात शुक्रवारी रात्री घडली.

पोलिसांनी सांगितले, लातूरकडून कळंबच्या दिशेने दुचाकीवर चारजण शुक्रवारी रात्री जात होते. दरम्यान, कळंबकडून शिमला मिरची घेऊन लातूरच्या दिशेने पिकअप टेम्पो भरधाव येत होता. जोडजवळा गावानजीक आल्यानंतर एका धाब्यानजीक भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराने उडविले. या भीषण अपघातात दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी गातेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक खोत यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. अपघातातील मयत चौघांना लातूरच्या श्वासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. रात्री उशीरापर्यंत दुचाकीवरील मयत चार जणांची नावे हाती आली नाहीत. टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दुचाकीवरील चारही जण रस्त्यालगत फेकले गेले. यामध्येच ते ठार झाल्याची माहिती गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक किशोर कांबळे यांनी दिली.

रात्रीची वेळ आणि सर्वत्र काळोख पसरला होता. दरम्यान, लातूरकडून निघालेल्या दुचाकीला कळंब कडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोराने उडविले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची माहिती गातेगाव पोलिसांनी दिली.

Web Title: Accident The bike and fast tempo Four people died on the Spot

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here