Home कोल्हापूर फिल्मीस्टाईल! पोलिस आणि डॉक्टरांच्या हातावर तुरी देऊन कैदी बेडीसह पसार

फिल्मीस्टाईल! पोलिस आणि डॉक्टरांच्या हातावर तुरी देऊन कैदी बेडीसह पसार

Kolahpur News: पोलीस दलात खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे. पोलिसांच्या आणि डॉक्टरच्या हातावर तुरी देऊन कैदी फिल्मी स्टाईलने पसार झाल्याची घटना घडली आहे.

Police and doctors are beaten and prisoners are released 

कोल्हापूर: पोलीस दलात खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे. कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणल्यानंतर तो फरार झाल्याची घटना घडली. आज (4 मार्च) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हातातून कैदी पळून गेल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निवास होनमाने (रा. तासगाव, जि. सांगली) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. उपचारासाठी सीपीआरमध्ये आणलेल्या कैदी निवास पोलिसांची नजर चुकवून बेडीसह पळाला. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये  झाली होती. हातातून कैदी पळून गेल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांनी कळंबा जेलमधील काही कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये आणले होते. यावेळी बेडी घातलेला कैदी निवास व्हनमानेला एका पोलिसासोबत उपचार कक्षात नेण्यात आले. उपचार करून झाल्यानंतर कैद्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिस कागदपत्रे घेण्यासाठी डॉक्टरांच्या कक्षात जाताच, व्हरांड्यात उभ्या असलेल्या निवास या कैद्याने धूम ठोकून पसार झाला. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कैदी पळाल्याचे ओरडून सांगितले. आरडाओरडा सुरु झाल्याने संबंधित पोलिसासह कर्मचारी कैद्याच्या दिशेने धावत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नजर चुकवून पीएम रूमच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून दसरा चौकच्या दिशेने फरार झाला. कैदी पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सीपीआरमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे.

Web Title: Police and doctors are beaten and prisoners are released 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here