Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: तरुणावर गोळीबार, आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना

अहमदनगर ब्रेकिंग: तरुणावर गोळीबार, आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना

Ahmednagar News:  स्थानिक युवकांनी शनिवारी सायंकाळी आतारवस्ती येथील एका तरुणावर गोळीबार (Firing) केल्याची घटना, जखमीस पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.

Two teams have been dispatched to search for the accused who firing the youth

कर्जत: तालुक्यातील कोरेगाव- कर्जत मुरकुटवाडी येथील स्थानिक युवकांनी शनिवारी सायंकाळी आतारवस्ती येथील एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून, जखमीस पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुरकुटवाडी येथे शनिवारी सायंकाळी प्रमोद विजय आतार (वय १९, रा. आतारवस्ती कोरेगाव) याच्यावर काही युवकांनी गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत आतार याच्या पायावर गोळी लागली असल्याची माहिती मिळत असून, त्यास तत्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश गावित

आतार याच्याकडून अद्याप पोलिसांना काहीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. परंतु, या प्रकरणात अद्याप माहिती देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. मात्र, चार ते पाचजणांच्या गटाने आतार याच्यावर गोळीबार केलेला असू शकतो, असे पोलिसांनी सांगितले.

यांनी भेट दिली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेच्या तपासासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक गावित यांनी दिली. या घटनेचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, कर्जत पोलिस तपास करीत आहे. कर्जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Web Title: Two teams have been dispatched to search for the accused who firing the youth

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here