Home Accident News Accident: वॅगनआर कारला भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

Accident: वॅगनआर कारला भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

Accident News:  खड्डा चुकवण्यासाठी वाहन चालकाने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला.

accident to WagonR car, three died on the spot

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वॅगनआर कारचा भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालघरच्या महालक्ष्मीजवळ वॅगनआर कारला भीषण अपघात झाला.

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर महालक्ष्मीनजीक ओव्हरटेक करताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारने पुढे असलेल्या कंटेनरला जोरात धडक दिली. एक खड्डा चुकवण्यासाठी वाहन चालकाने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कारचा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत. मृत्यूमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल असून पुढील उपचार सुरू आहेत.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

मृतांची नावे

1.नरोत्तम छना राठोड (वय 65 वर्ष)

2.केतन नरोत्तम राठोड (वय 32 वर्ष)

3.आर्वी दीपेश राठोड (वय एक वर्ष)

 जखमींची नावे

  1. दीपेश नरोत्तम राठोड (वय 35 वर्ष) चालक
  2. तेजल दीपेश राठोड (वय 32 वर्ष)
  3. मधु नरोत्तम राठोड (वय 58 वर्ष)
  4. स्नेहल दीपेश राठोड (वय अडीच वर्ष)

Web Title: accident to WagonR car, three died on the spot

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here