Home संगमनेर संगमनेर तालुक्यात शिवानंदन एंटरप्राइजेस या शेती साहित्य दुकानाला अचानक आग, २० लाखांचे...

संगमनेर तालुक्यात शिवानंदन एंटरप्राइजेस या शेती साहित्य दुकानाला अचानक आग, २० लाखांचे नुकसान

Sangamner Shop Fire: कोकणगाव येथील शिवानंदन एंटरप्राइजेस या शेती साहित्य विक्रीच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना.

fire broke out at Sivanandan Enterprises, an agricultural material shop in Sangamner 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील शिवानंदन एंटरप्राइजेस या शेती साहित्य विक्रीच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना काल सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले.

संदीप शिंदे यांच्या मालकीचे कोकणगाव येथे शेती साहित्य विक्रीचे दुकान आहे. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सदर दुकानाच्या आतून धुर येत असल्याचे काही नागरीकांच्या लक्षात आले. मात्र दुकानाचे शटर बंद होते. परंतु दुकानाच्या आत आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. आतमधील प्लॅस्टिक पाईप, ड्रीपचे पाईप, सीनटेक टाकी, पाईपचे सुलोचन, इलेक्ट्रीक सामान असल्याने आगीने जास्तीच पेट घेतला.

कोकणगाव येथील काही तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती कळताच थोरात साखर कारखान्याची अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचला. पाण्याचा प्रचंड मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आग मोठ्या प्रमाणावर असल्याने दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले.

Web Title: fire broke out at Sivanandan Enterprises, an agricultural material shop in Sangamner 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here