मारुती कार, आयशर टेम्पो आणि बैलगाडी यांचा भीषण अपघातात एक ठार, एक बैल ठार
Ahmednagar | Kopargaon Accident: कारची आयशर टेम्पोला धडक बसून ती दुभाजकावर धडकली. त्यात एक जण ठार, टाटा 407 टेंपो आणि काळे कारखान्याची ऊस घेऊन जाणारी टायर बैलगाडी यांच्यात धडक.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात पांढर्या रंगाची मारुती डिझायर (क्रं. एमएच-15 एचक्यु-9081) कारची आयशर टेम्पोला धडक बसून ती दुभाजकावर धडकली. त्यात एक जण ठार झाला. दरम्यान याच ठिकाणी ऊसाची बैलगाडी आणि 407 टेंपो यांची धडक होऊन त्यात एक बैल जागीच ठार झाला.
कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात एका पाठोपाठ दोन अपघात झाले आहे. पहील्या अपघातात सकाळी टाटा 407 टेंपो आणि काळे कारखान्याची ऊस घेऊन जाणारी टायर बैलगाडी यांच्यात धडक झाली. या दुर्घटनेत एक बैल जागीच ठार झाला आहे. तर गाडीवरील महिला व मुलगा जखमी झाले आहे. ही बैलगाडी नांदगाव तालुक्यातील पिंप्री येथील आहे.
दुसरा अपघात मारुती डिझायर कार घारी शिवारात सदगुरूकृपा पेट्रोल पंपाजवळ दुभाजकावर धडकली. त्यात चालक ठार झाला आहे.
Web Title: Maruti Car, Eicher Tempo and Bullock Cart Kill One in Horrific Accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App