Home क्राईम संगमनेर: पुतण्याकडून चुलता-चुलतीला मारहाण, झाडे कापण्यावरून वाद

संगमनेर: पुतण्याकडून चुलता-चुलतीला मारहाण, झाडे कापण्यावरून वाद

Sangamner Crime: सामाईक क्षेत्रातील कापलेल्या झाडांवर चुना टाकत असलेल्या चुलता-चुलतीला पुतण्याने मारहाण करत शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी.

Sangamner Crime Cousin beaten by nephew

घारगाव : सामाईक क्षेत्रातील कापलेल्या झाडांवर चुना टाकत असलेल्या चुलता-चुलतीला पुतण्याने मारहाण करत शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी शिवारात शनिवारी (दि. ७) सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी अनिता दत्तात्रय बोडके (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या योगेश सखाराम बोडके, सखाराम धोंडीभाऊ बोडके, दिलीप सोपान बोडके (सर्व रा. म्हसवंडी, ता. संगमनेर, हल्ली रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे)

अनिता बोडके व त्यांचे पती दत्तात्रय बोडके हे त्यांचे सामाईक शेतातील कापलेल्या झाडांवर चुना टाकत असताना योगेश बोडके, सखाराम बोडके, दिलीप बोडके यांनी त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीचा पुतण्या योगेश याने काठीने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर मारले. सखाराम व दिलीप यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे पती दत्तात्रय हे सोडविण्यास आले असता त्यानाही काठीने मारहाण केली.

योगेश व दिलीप यांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी अनिता बोडके व त्यांचे पती दत्तात्रय बोडके हे जखमी झाले असून, अनिता बोडके या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख अनिता बोडके व त्यांचे पती आले असता त्यांनाही योगेशने काठी करीत आहेत.

Web Title: Sangamner Crime Cousin beaten by nephew

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here