Home अकोले अकोलेतील घटना: तीन बिबट्यांनी पाडला चारशे कोंबड्यांचा फडशा

अकोलेतील घटना: तीन बिबट्यांनी पाडला चारशे कोंबड्यांचा फडशा

Akole News: मेहंदुरी येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी चारशे कोंबड्यांचा फडशा पडल्याची घटना.

Three Bibatya destroyed a flock of four hundred chickens

अकोले : अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी चारशे कोंबड्यांचा फडशा पडल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी घुसून चारशे कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने येथे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी वनविभागाने मेहेंदुरी उंचखडक शिवारातून एक तर निंब्रळ निळवंडे परिसरातून चार बिबटे जेरबंद केले तरी ही परिसरात अनेक बिबटे संचार करीत असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास बंगाळ यांच्या पोल्ट्रीत तीन बिबटे घुसले, कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले, अनेक कोंबड्यांना जखमी झाल्या आहेत. पहाटे चार वाजता बिबटे पोल्ट्रीत घुसल्याची लक्षात आले. त्यानंतर बिबटे जवळच्या उसात पसार झाले. शनिवारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम, वनपाल विठ्ठल पारधी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला. शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

Web Title: Three Bibatya destroyed a flock of four hundred chickens

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here