Home Accident News अहमदनगर: गॅस टाक्या घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला

अहमदनगर: गॅस टाक्या घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला

Ahmednagar | Pathardi Accident: करंजी घाटातील माणिकपीर बाबाच्या वळणावर अंदाज न आल्याने उलटला.

Accident truck carrying gas tanks overturned in the ghat

पाथर्डी | करंजी : चाकणवरून गॅसच्या टाक्या घेऊन नांदेडला जाणारा ट्रक कल्याण- निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या अवघड वळणावर उलटला. प्रसंगावधान राखल्याने चालक-वाहक बचावले. ही घटना बुधवारी (दि.४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

चाकण येथून इंडियन ऑइलच्या गॅस टाक्या घेऊन नांदेडकडे जाणारा ट्रक (क्र. एम. एच. २६ एडी २४७४) कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील अवघड असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या अवघड वळणावर उलटला. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या अपघातात प्रसंगावधानतेमुळे ट्रक चालक अमोल शहादेव पालवे व त्याचा साथीदार पप्पू मारुती पालवे सुदैवाने बचावले. घाटाच्या कठड्यामुळे हा ट्रक खोल दरीत गेला नाही. करंजी घाटाच्या पायथ्याशीच महामार्ग पोलिसांची चौकी आहे. अपघातास बारा तास उलटून गेले तरी अद्याप महामार्ग पोलिसांची या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळू शकली नाही.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमधील गॅसच्या टाक्या रस्त्यावर पडल्याने काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांच्या मदतीने या रस्त्यावरील गॅसच्या टाक्या बाजूला केल्या. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.

Web Title: Accident truck carrying gas tanks overturned in the ghat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here