Home जळगाव आई वडील कामासाठी गावात गेले, मुलाने दरवाजा आतून बंद केला अन घडले...

आई वडील कामासाठी गावात गेले, मुलाने दरवाजा आतून बंद केला अन घडले धक्कादायक

Jalgaon Suicide News: एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. आत्महत्या मागील कारण अद्याप समजू शकले नाही.

young man committing suicide by hanging himself in a residential house

जळगाव: जळगाव शहरातील रायसोनी नगरातील एका तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मुकेश सुभाष सोनार (वय-४०) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील रायसोनी नगरात मुकेश सोनार हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसापासून मुकेश याची पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. मुकेश हा हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. बुधवारी त्याची आई कल्पनाबाई सोनार आणि वडील सुभाष नारायण सोनार हे कामाच्या निमित्ताने गावात आले होते. त्यावेळी घरात मुकेश हा घरात एकटाच होता. यादरम्यान मुकेश याने दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचे आईवडील हे घरी आले. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. घरातील लोकांनी शेजारचांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले.

Web Title: young man committing suicide by hanging himself in a residential house

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here