अहमदनगर ब्रेकिंग: घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार, क्लिनर गंभीर
Ahmednagar News: करंजी घाटामध्ये ट्रकचा ताबा सुटल्याने मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये ट्रकचा ताबा सुटल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर जखमी झाला आहे अवघड वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नगरकडून बीडकडे करंजी घाट मार्गे रासायनिक खत घेऊन जात असलेल्या ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने करंजी घाटातील एका धोकादायक वळणावरील खोल दरीत हा ट्रक जाऊन पडला. या अपघातामध्ये ट्रक चालक शैलेश लोंढे (रा. नांदूरघाट) यांचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर प्रवीण गायकवाड (रा. शिरूर) गंभीर जखमी झाला असून ट्रकचे व ट्रक मधील रासायनिक खताचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती समजताच पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ पोलीस फौजफाटा घटनास्थळी पाठवून त्या ठिकाणी मदत कार्य केले. तसेच महामार्ग पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी येऊन या अपघातामुळे करंजी घाटात खोळंबलेली वाहतूक कोंडी दूर करून अपघातग्रस्त ट्रक दरीतून वरती काढून ट्रक चालकाचा मृतदेह सेव विच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना केला. करंजी घाटात खोल दरीत पडलेल्या ट्रकला पाहण्यासाठी प्रवाशांनी देखील करंजी घाटात मोठी गर्दी केली होती.
Web Title: Accident truck fell into the ravine in the ghat; Driver killed, cleaner critical
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App