Home क्राईम संगमनेरच्या दोघांकडून गांजा तस्करी, १२ किलो गांजा जप्त

संगमनेरच्या दोघांकडून गांजा तस्करी, १२ किलो गांजा जप्त

Ganja smuggling: ओतूर पोलिसांनी पकडला १२ किलो गांजा जप्त.

Ganja smuggling from Sangamner duo, 12 kg of ganja seized

संगमनेर: संगमनेर येथील २ आरोपी ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १२ किलो गांजा ओतूर पोलिसांनी सदर आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. संगमनेरचे हे आरोपी सदर गांजा कुठे घेऊन जात होते. यामागचे सूत्रधार कोण ? याचा शोध सुरू आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, ८ जून रोजी ओतूर जि. पुणे पोलिस ठाणे हद्दीतून अहमनगर कडून कल्याण कडे जाणाऱ्या एका बोलरो वाहनातून गांजाची तस्करी होत आहे अशी माहिती मिळाल्याने ओतूर पोलिसांनी कातकरे वस्तीच्या बाजूला सदर गांजाची तस्करी पकडली आरोपींमध्ये सिध्दार्थ किशोर टेकाडे रा. वाडेकर गल्ली संगमनेर व संतोष दत्तात्रय जऱ्हाड रा. माळीवाडा संगमनेर यांचा समावेश असून त्याच्यांकडून १२ किलो गांजासह बोलरो गाडीही जप्त करण्यात आली. सुमारे १५ लाखाचे वर मुद्देमाल ओतूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. अधिक तपास ओतूर पोलिस करत आहे.

दरम्यान, संगमनेर शहरात अनेक ठिकाणी बेकायदा अंमली पदार्थ विक्री सुरूअसते एका मोठा डिलर संमनेरातील जोर्वे नाका परिसरात राहतो तेथूनच तो ठोक स्वरूपात अंमली पदार्थ विकत असतो आत्ता ४ दिवसांपूर्वीच संगमनेर हद्दीत एका वाहनातून २ किलो गांजा पकडण्यात आला होता म्हणून ओतूरमध्ये पकडलेल्या १२ किलो गांजाचे संगमनेर कनेक्शन असण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Ganja smuggling from Sangamner duo, 12 kg of ganja seized

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here