Home अहमदनगर Accident | अहमदनगर: दोन कारचा भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

Accident | अहमदनगर: दोन कारचा भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

Accident Two car crashes, two killed, one injured

Ahmednagar | Newasa | अहमदनगर: अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरील कांगोनी फाटा शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या घटनेत दोन  जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादच्या दिशने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा कारला समोरून येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जन गंभीर जखमी झाला आहे. या मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. शिखा मुरलीधर गडपायले वय ३६ ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परेश मुरलीधर गडपायले वय ३२ रा. पुणे पिंपरी सौदागर आणि सोनिका भीमराव आवसरमोल वय ३२ रा. औरंगाबाद यांच्या अपघातात मृत्यू झाला.     

Web Title: Accident Two car crashes, two killed, one injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here