Home अहमदनगर आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले, युवकावर गुन्हा दाखल

आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले, युवकावर गुन्हा दाखल

minor girl was kidnap by showing a lure

Ahmednagar | कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील आनंदवाडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnap) केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी जामखेड येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश शिरगीरे (रा. शिरगीरे वस्ती,जामवाडी, ता. जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलगी ही तालुक्यातील एका विद्यालयात नववीत शिकत होती. ही मुलगी कुटुंबियांसोबत घरासमोरच्या पडवीत झोपली होती. मात्र पहाटे साडेपाच वाजता ती तेथे आढळून आली नसल्याचे आईला समजले.

मुलीने कपाटातील सोन्याचे दागिने नेले असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. माहिती घेतली असता ही मुलगी ऋषिकेश शिरगीरे याने आमिष दाखवून पळवून नेल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी आरोपीच्या घरी जावून विचारणा केली. मात्र त्याच्या वडिलांनी तो घरी आला नसल्याचे सांगितले. नंतर मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनला धाव घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: minor girl was kidnap by showing a lure

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here