धक्कादायक: भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडत झाडाला धडक
पालघर: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक-जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचोंडी येथे एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडून झाडाला धडक दिल्याने अपघात (Accident) घडला. या अपघातात दोन बालक चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी ही घटना घडली. दरम्यान, चालकाने घाईघाईने ट्रक पुन्हा मागे घेतला एक जण गंभीर जखमी झाला, तर तेथील एका दुकानाला सुद्धा धडक दिल्याने दुकानाचे मोठे नुकसान केले.
या अपघातात आरोही नकुल सोनार वय 5 वर्ष, पायल भालचंद्र वारघडे वय 9 वर्षे या दोन्ही मुली मयत झाल्या आहेत. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
मोरचोंडी गावाशेजारूनच नाशिक-जव्हार महामार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी भरधाव वाहने ये-जा करत असतात. आज दुपारी 3.17 मिनिटांनी जव्हारहून नाशिकच्या दिशेने एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. यावेळी नशेत असलेल्या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने विरुद्ध दिशेने तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाश्यांना चिरडत झाडाला धडक दिली.
चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.
Web Title: Accident Two children were crushed by a truck and hit a tree