Home अहमदनगर राज्यात या तारखेला पावसाचे संकट, पंजाब डख यांचा अंदाज

राज्यात या तारखेला पावसाचे संकट, पंजाब डख यांचा अंदाज

Rain crisis in the state on this date, Punjab Dakh forecast

Ahmednagar | Rain Alert:  राज्यातील अनेक भागांत  सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि अन्य पिकांची काढणीचे काम सुरु आहे. त्यात पुन्हा भारतीय हवामान विभाग पुणे आणि हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 8 ते 11 मार्चदरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टी या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Rain weather alert 2022) यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळणार आहे.

7 ते 9 मार्चला राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आयएमडी पुणे यांनी तर 8 ते 11 मार्च दरम्यान पावसाची शक्यता मराठवाड्यातील हवामान अभ्यासक डख यांनी वर्तवली आहे. पिकांची काढणी 7 मार्चपर्यत पूर्ण करावी, असे पंजाब डख यांनी सांगितले आहे. राज्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून यामुळे रिमझिम पाउस पडत राहील 8 ते 11 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहून उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टी या चार भागात जास्त पाऊस राहील उर्वरीत भागात तुरळक पडण्याचा अंदाज डख यांचा आहे. तसेच 7 ते 11 मार्च दरम्यान देशात तामीळनाडू, केरळ, कर्नाटक आध्रंप्रदेश या राज्यात जोरदार पाउस पडणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Rain crisis in the state on this date, Punjab Dakh forecast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here