Home अहमदनगर Accident: कापूस वेचणी करताना दोन शेतमजुरांवर वीज कोसळली

Accident: कापूस वेचणी करताना दोन शेतमजुरांवर वीज कोसळली

Accident Two farmers were electrocuted

राहुरी | Accident: राहुरी तालुक्यात शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील पाथरे शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या टोळीतील शेतमजुरांवर वीज कोसळून गंभीर इजा झाल्याची घटना घडली. दोघानाही रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पाथरे शिवारात ज्ञानेश्‍वर आप्पासाहेब जाधव या शेतकर्‍याच्या शेतात बारा शेतमजुर कापूस वेचणी करत असताना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाऊस आल्यानंतर बारा शेतमजूर भोकराच्या झाडाखाली बसले असता शब्बीरभाई जानूभाई पठाण व हिराबाई रामदास बाचकर या दोघांच्या अंगावर वीज कोसळली.

नवीन फिचर असलेले पोर्टल (लाईव टीव्ही व लाईव बातम्या) वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज 

यात शब्बीरभाई जानूभाई पठाण यांच्या पाठीला व पायाला गंभीर जखमा झाल्या तर हिराबाईच्या अंगावर लोळ उडाले. त्यांना श्रीरामपूर येथे एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कामगार तलाठी सुवर्णा शिंदे व पोलीस पाटील दादासाहेब पवार यांंनी तातडीने घटनास्थळी जाऊन भेट दिली.  या घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली.  

Web Title: Accident Two farmers were electrocuted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here