Home Accident News वऱ्हाडी बस दरीत कोसळली, दोघे ठार तर १० हून अधिक जखमी: Accident

वऱ्हाडी बस दरीत कोसळली, दोघे ठार तर १० हून अधिक जखमी: Accident

Accident: चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस बारीत कोसळली. चालकाने बाहेर उडी घेतली, दोघांचा मृत्यू.

Accident Vharadi bus falls into valley, two killed

Accident : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथून साक्री येथे विवाह समारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या खासगी बसला धाकड बारीत अपघात झाला. या अपघातात बस बारीत कोसळली. यावेळी वाहनाने घेतलेल्या चार ते पाच पलटीमुळे वाहनातील दोन वऱ्हाडींचा मृत्यू झाला तर १० हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी धाकड बारी जवळ बस पोहचताच अपघाती वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस बारीत कोसळली. त्यावेळी चालकाने धावत्या बसमधून बाहेर उडी घेतली.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

या अपघातात मखमलाबाई ह्याळीज (वय ६०) , मयुरी बोरसे (वय ११) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती समजताच पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.

Web Title: Accident Vharadi bus falls into valley, two killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here