Home अकोले बाललैंगिक अत्याचाराच्या आरोपातून अकोलेतील तरुणाची निर्दोष मुक्तता

बाललैंगिक अत्याचाराच्या आरोपातून अकोलेतील तरुणाची निर्दोष मुक्तता

Akole sexual abuse charges: अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Akole youth acquitted of child sexual abuse charges

संगमनेर: बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

परीक्षेसाठी प्रवेश पत्र काढण्याकरिता अकोले येथील सायबर कॅफेमध्ये गेलेल्या बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गावातीलच तरुणाकडून अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चार वर्षांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे यांनी करत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या घटनेची सुनावणी सुरू होती. खटल्या दरम्यान आरोपी जामिनावर मुक्त होता.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी विरोधात बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये आरोपीवर दोषारोप निश्चित करून या घटनेची सुनावणी न्यायालयात सुरू होती. सुनावणी दरम्यान आरोपीने आपल्यावरील दोषारोप नाकारले. अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले नसल्याचे व खोटेपणाने त्याला या प्रकरणात दबाव आणण्याच्या उद्देशाने गोवण्यात आले असल्याचा बचाव आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर करण्यात आला. तसेच फिर्यादीच्या मावस बहिणीने आरोपीच्या सख्ख्या भावाशी प्रेमविवाह केला आहे. यासाठी मुलीच्या कुटुंबातून विरोध होता. त्यावरून दोन्ही कुटुंबात वादविवाद झाले मुलीच्या कुटुंबाकडून पैशाची मागणी करण्यात आली. अशावेळी आरोपी हा घरातीत कर्ता असल्याने त्याता खोट्या प्रकरणात गुंतवून त्याच्यावर दबाव आणण्यासाठी खोटी केस केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

याप्रकरणी न्यायालयासमोर फिर्यादी, फिर्यादीचे वडील आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीने  वाईट उद्देशाने फिर्यादीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आला नाही. त्यामुळे समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी आरोपीची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अँड नईम इनामदार यांनी काम बघितले त्यांना अॅड. झेड. एच. तांबोळी, अॅड. एम. एन. इनामदार, अॅड. ए. एस. सय्यद यांनी मदत केली.

Web Title: Akole youth acquitted of child sexual abuse charges

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here