Home अहमदनगर Accident: नऊ टन सफरचंद घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात, प्रवाशांची झुंबड  

Accident: नऊ टन सफरचंद घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात, प्रवाशांची झुंबड  

Accident when a truck carrying apples overturned

Pathardi | पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील करंजी  गावाजवळ मुंबईहून नांदेडकडे  नऊ टन सफरचंद  घेऊन जाणारा ट्रक महामार्गवरील खड्डे चुकवताना रस्त्याच्या कडेला उलटल्याने झालेल्या अपघातात (Accident) सफरचंद रस्त्यावर पडले. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर सफरचंद पडल्याचे दिसताच सफरचंद घेऊन जाण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई वाशी मार्केट येथुन नऊ टन सफरचंद भरलेला ट्रक नगरमार्गे नांदेडकडे जात असताना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करंजी गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना या ट्रकला अपघात झाला व हा ट्रक रस्त्यावरच उलटला. अपघातानंतर ट्रकमधील सफरचंद अक्षरशः रस्त्यावर पडले. त्यामुळे ट्रकसह सफरचंदाचे देखील मोठे नुकसान झाले.

रस्त्यावर सफरचंद पडल्याचे माहिती करंजीसह परिसरातील ग्रामस्थांना समजतात अनेकांनी सफरचंद आणण्यासाठी या अपघातग्रस्त ट्रककडे धाव घेतली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी देखील सफरचंद घेऊन जाण्यासाठी अपघातग्रस्त ट्रक जवळ गर्दी केली. काही वेळाने महामार्ग पोलिस  व करंजी आऊट पोस्टचे पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला ग गर्दी हटविण्यात आली.

Web Title: Accident when a truck carrying apples overturned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here