Home क्राईम Rape Case: मित्राच्या प्रेयसीला लॉजवर नेऊन दोघांनी केला बलात्कार

Rape Case: मित्राच्या प्रेयसीला लॉजवर नेऊन दोघांनी केला बलात्कार

Nagpur Rape Case Capital Five arrested for sexual assault on girl

नागपूर | Nagpur Crime: मित्राच्या प्रेयसीला वेगवेगळे आमिष दाखवून लॉजवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. त्यानंतर तिला देहव्यापारात (Prostitution Business) ढकलत तिच्या देहाचाही केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पाच आरोपींना अटक केली आहे.

विशाल उर्फ दत्तू दाभणे ऊर्फ खाटीक, सत्यजित ऊर्फ निखिल बांगड, सचिन इंगळे, आकाश ऊर्फ विक्की भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अमित लोखंडे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांनी दहावीत असलेल्या मुलीला देहव्यवसाय करून घेण्यासाठी नागपुरात आणल्याचे उघड झाले आहे.

यातील मुख्य आरोपी विशाल कुख्यात गुंड  आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या २८ गुन्ह्यांची नोंद आहे. सचिनवरही गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे आहेत. विशालचा एक मित्र जवळच्या गावात राहतो. त्याच्या मैत्रिणीची विशालसोबत ओळख झाली. ती खाजगी काम करायची. या माध्यमातून तिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. विशालने या दोघींना नोकरीचे व पैशाचे आमिष दाखविले. आमिषाला बळी पडताच दोघींनाही नागपुरात आल्या. त्यांना काही दिवस विशालने आपल्या घरी ठेवले . सत्यजित आणि सचिन यांनी मुलींना हुडकेश्वरातील लॉजवर नेऊन दोघांनी एकीवर बलात्कार (sexual assault) केला तर दुसरीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मित्राच्या प्रेयसीसाठी ग्राहक शोधायला लागला. अशाप्रकारे दोन्ही मुलींना विशालने देहव्यापाराच्या दलदलीत लोटले. आरोपी आकाश आणि अमितने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

Web Title: Nagpur Rape Case Capital Five arrested for sexual assault on girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here