Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Accident: संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Accident Youth dies in collision with unknown vehicle in Sangamner taluka

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.  अज्ञात वाहनाने जबर जखमी होऊन पादचारी जागीच ठार झाला. मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास ही अपघाताची (Accident) घटना घडली.

संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील कर्जुले पठार येथे महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिल लहानू अरगडे वय ३८ वर्ष असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातातील वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गोंधले यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. या पसार अज्ञात वाहनाचा तपास सुरु असल्याचा पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गोंधले यांनी सांगितले.

Web Title: Accident Youth dies in collision with unknown vehicle in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here