Home संगमनेर संगमनेर: उसातील गवत काढीत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक

संगमनेर: उसातील गवत काढीत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक

Accused arrested for sexual abuse minor girl

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार (sexual abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात कामाला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली.

याबाबत पिडीत मुलीने फिर्याद दाखल केली आहे. यावरून रामा उर्फ हर्षद बाळासाहेब भोकनळ रा. मंगळापूर ता. संगमनेर याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीचे आईवडील शेतात मजुरीने काम करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. ही मुलगी आईचा जेवणाचा डबा घेऊन गेली होती. येताना जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेली होती. उसातील गवत काढीत असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला पिडीतेच्या नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.   

Web Title: Accused arrested for sexual abuse minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here