Home महाराष्ट्र संतापजनक: 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची देहविक्री, अनेकांनी केले अत्याचार

संतापजनक: 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची देहविक्री, अनेकांनी केले अत्याचार

Prostitution of a minor girl for 500 rupees and sexual harrassment

लातूर | Latur : लातूरमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत ही घडली आहे. फक्त 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला देहविक्री (Prostitution) करायला भाग पडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या पीडितेवर अनेकांनी अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी 09 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहा जणांना अटक  केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात फक्त 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला चक्क देहविक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेने तिला ड्रेस आणि सॅंडल विकत घेऊन दिली होती. काही दिवसानंतर ‘ड्रेस आणि सॅंडलचे 500 रुपये दे नाहीतर आम्ही सांगेन ते कर’ असा दबाव दबाव आणून तिचा वाईट हेतूने वापर करून घेण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे, एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंधाचे फोटो व्हिडीओ शूट करून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचं देखील समोर आले आहे.  याबाबत १५ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीनेच पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षकांना घडलेली आपबिती कथन केली. यानंतर तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 9 जणांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील सहा आरोपीना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा असल्यानं स्वतः पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी बारकाईनं लक्ष घातलं आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झालंय.

Web Title: Prostitution of a minor girl for 500 rupees and sexual harassment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here