Home बुलढाणा Rape | शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून शिक्षिकेवर बलात्कार

Rape | शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून शिक्षिकेवर बलात्कार

Rape of a teacher by a ladies teacher

बुलडाणा | Buldhana: जिल्ह्यातील खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार (rape)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला तसेच आरोपीने शिक्षिकेला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये कैद करुन ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन सदर प्रकारपोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव शहरात राहणाऱ्या 36 वर्षीय पीडित शिक्षिका या तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहेत. पीडित शिक्षिका ज्या गावातील शाळेत कार्यरत आहेत त्याच गावाजवळील गावातील शाळेत 46 वर्षीय आरोपी शिक्षक कार्यरत आहे. आरोपी शिक्षकाचं श्रीकांत वानखडे असे नाव आहे. पीडिता आणि आरोपी आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये कार्यरत असल्याने त्यांची खामगाव शहरापासून शाळेत जाताना भेट होत असे.  ते शिक्षकांच्या कारने खामगावरुन ये-जा करत असल्याने त्यांच्यात चांगलीच ओळख निर्माण झाली.  

दरम्यान आरोपी शिक्षकाने पीडित शिक्षिकेला काहीतरी कारण सांगत निमंत्रण देत आपल्या घरी बोलावले. शिक्षिका आरोपीच्या घरी आल्यानंतर त्याने घराचे आतील दार लावले. पीडितेने यावेळी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पीडितेला काहीतरी वाईट घडणार याची जाणीव झाली. त्यामुळे तिने घराबाहेर पडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. यावेळी आरोपी वानखेडेने चाकूचा धाक दाखवत पीडितेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने पीडितेचे आपत्तीजनक परिस्थितीतले फोटो काढून ठेवले. संबंधित घटनेची माहिती कुणाला सांगितली तर फोटो तुझ्या नवऱ्याला दाखविण्याची आणि व्हायरल करण्याची  धमकी आरोपीने पीडितेला दिली.

या घटनेने पिडीत पूर्णपणे ढासळली होती.  अखेर तिने निर्धार करीत पीडितेने तातडीने शहर पोलीस ठाणे गाठत घटनेबाबत माहिती माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षक श्रीकांत वानखेडे विरोधात कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ ( क), (ब) आणि ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Rape of a teacher by a ladies teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here