Home अहमदनगर मंत्री गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक

मंत्री गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक

Accused arrested in Firing of Gadakh's personal assistant

नेवासा | Nevasa: जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहायकवर झालेल्या गोळीबार प्रकरणी (Firing Case) चार आरोपींपैकी एका आरोपीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी संध्याकाळी शेवगाव परिसरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी तीन आरोपी पसार आहेत.

मंत्री शंकरराव गडाख  यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांना शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात पिस्तूलाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग करून जखमी केले होते. या घटनेनंतर घटनेत वापरलेल्या चारचाकी वाहनासह सर्व चार आरोपी पसार झाले होते. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हे शाखेचे अनिल कटके) यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी पाठवलेले होते.

आज रविवारी संध्याकाळी या घटनेतील आरोपी नितीन शिरसाठ हा शेवगाव परिसरात लपला असल्याची माहिती मिळाल्याने त्या परिसरातून त्यास अटक करण्यात आली आहे. इतर बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे व ऋषिकेश शेटे अजुनही फरार आहेत. या तीन आरोपीस अटक करण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे समजते.

Web Title: Accused arrested in Firing of Gadakh’s personal assistant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here