Home अकोले अकोलेतील आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी बेडीसह फरार

अकोलेतील आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी बेडीसह फरार

Breaking News | Pune Crime:  पोस्को अंतर्गत पोलीस कोठडीत असणारा आरोपी आळे फाटा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसह फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

accused escaped with the handcuffs after giving a hammer to the police

जुन्नर : आळेफाटा पोलीस ठाण्याचा आरोपी जुन्नर येथून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसह फरार झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार भुजंग नारायण सुकाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्नर पोलीसानी अजय तानाजी मुठे, रा. कोतूळ ता. अकोले,जि अहमदनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 26 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सब जेल मध्ये नेत असताना ही घटना घडली आहे.  

याबाबतची माहिती अशी की, पोस्को कायद्याअंतर्गत पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जुन्नर येथील कारागृहात ठेवण्यासाठी (ता.२६ रोजी) घेऊन जात असताना पोलीस गाडी जुन्नर पोलीस ठाण्याजवळ परदेश्पुरा येथे आली असता आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत हातकडीसह पळ काढला. प्रजासत्तादिनी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला मात्र तो मिळून आला नाही. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गीजरे अधिक तपास करत आहेत.

Web Title: accused escaped with the handcuffs after giving a hammer to the police

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here