Home अहमदनगर महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी निरीक्षक वाघ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी निरीक्षक वाघ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Accused Inspector Vikas Wagh's pre-arrest bail was rejected

अहमदनगर | Ahmednagar: कोतवाली पोलीस ठाण्याचा निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. महिलेवर वेळोवेळी अत्याचार व तिला मारहाण प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने २९ सप्टेंबर रोजी विकास वाघ यांच्याविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिली होती. निरीक्षक वाघ याने बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केला होता. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या अत्याचारातून पिडीत महिला गर्भवती राहिली. या निरीक्षकाने तिला गर्भपात करण्यास सांगितले. याबाबत महिला अधीक्षक कार्यालयात तक्रार करायला गेली हे वाघ यांना समजल्यानंतर त्याने त्या महिलेला बियरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर या महिलेने २९ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेव्हापासून निरीक्षक वाघ हा फरार होता. त्याच्या निलंबनाची कारवाई देखील पोलीस अधीक्षक यांनी केली.

दरम्यान वाघ याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. यात सरकारी पक्ष्याच्या वतीने सरकारी वकील अर्जुन पवार हे काम पाहत आहेत. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद पवार यांनी केला. जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Accused Inspector Vikas Wagh’s pre-arrest bail was rejected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here