Home श्रीगोंदा बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या मृत्यूमुखी

बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या मृत्यूमुखी

Shrigonda Eight goats die in leopard attack

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे देवमळा परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्या एकाच रात्रीत फस्त केल्याची घटना बुधवारी घडली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या मृत्यूमुखी पावल्या आहेत. मढेवडगाव परिसरात बिबट्याने चांगलेच बस्तान बसविले आहे. या परिसरातील कुत्री गायब झाली आहेत. आता त्याने शेळ्यांकडे मोर्चा वळविला आहे.

महादेव कांबळे, नाना कोळपे, सोनबा भांडे, रंगनाथ मांडे, राजू शिंगटे यांच्या आठ शेळ्या बुधवारी रात्री अंगणातून नेऊन ठार केल्याची माहिती राहुल साळवे यांनी दिली आहे. उसाच्या शेतात दिवसा दबा धरून बसलेला बिबट्या रात्री पोटासाठी शिकार शोधणे असा दिनक्रम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लहान मुले व शेळ्या, वासरे यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना बिबट्याला घेऊन जगावे लागणार आहे. बिबट्या हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. रानडुकर यांचा बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या पुरेसा आहे, रात्रीच्या वेळी बाहेर जाताना काठी व बत्ती बरोबर असावी. लहान मुले व शेळ्या, मेंढ्या, वासरे यांना बंदिस्त ठेऊन त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन सहायक वनसंरक्षक पुणे येथील कल्याण साबळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shrigonda Eight goats die in leopard attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here