Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: महिला तलाठी लाच घेताना रंगेहाथ एलसीबीच्या जाळ्यात – Bribe

अहमदनगर ब्रेकिंग: महिला तलाठी लाच घेताना रंगेहाथ एलसीबीच्या जाळ्यात – Bribe

Accused LCB's net while taking female talathi bribe

Parner | पारनेर: तक्रारदाराच्या कुटुंबाची वारसाहक्काने नावे लावण्यासाठी गावच्या महिला कामगार तलाठ्याने एक हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील तिखोल येथे ही घटना घडली आहे. लता एकनाथ निकाळजे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.  

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपाधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक हरिश खेडकर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोना. रमेश चौधरी, विजय गंगुल, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, चालक पो हवालदार हरुन शेख, राहुल डोळसे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील किन्ही येथील तलाठी कार्यालयात मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तिखोल येथील ३० वर्षीय पुरुषाने यासंबंधी तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या लाच प्रकरणी लता निकाळजे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पारनेर येथील तहसील कार्यालयात पोलिस पंचनामासाठी आणले.

तक्रारदार यांनी त्यांचे तिखोल गावातील आजोबा व वडील यांचे नावे असलेली शेतजमीन वारसा हक्काने तक्रारदार, त्यांची आजी, आई, भाऊ यांचे नावे करुन त्यांचे नावाची नोंद लावणेकरिता अर्ज दिला होता. सदरची नोंद लावणेकरिता आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचेकडे २ हजार रूपयांची ची मागणी केली.

तक्रारदार  यांनी आरोपी निकाळजे यांना १ हजार रुपये दिले होते उर्वरित एक हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या पडताळणीमध्ये आरोपी निकाळजे यांना एक हजार रुपयांची लाच (bribe) घेताना रंगेहात पकडण्यात आले.

Web Title: Accused LCB’s net while taking female talathi bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here