Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Two brothers killed in electric shock

Karjat | कर्जत: कर्जत तालुक्यातील बेनवडी शिवारामध्ये धुमाळ वस्ती येथे दुर्दैवी घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का (electric shock) बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन हनुमंत धुमाळ (वय २२) व अमोल हनुमंत धुमाळ (वय २५) असे या दोघा भावांची नावे आहेत.

याबाबत  अधिक माहिती अशी की,  बेनवडी शिवारामध्ये धुमाळ वस्ती येथे राहत असलेले सचिन हनुमंत धुमाळ वय 22 वर्ष हे गाईंची धार काढून रात्री दूध शेडवर बादलीत ठेवलेले होते ही शेडला अडकवलेली बादली काढत असताना त्या बादलीमध्ये विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते ओरडले असता यानंतर त्यांचा सख्खा भाऊ अमोल हनुमंत धुमाळ वय 25  वर्ष हा त्यांच्या मदतीला गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला आणि दोघे भाऊ जागीच मृत्युमुखी पावले.

Web Title: Two brothers killed in electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here