Home अकोले अकोले: पंचायत समितीच्या माजी उपसभापतीला मारहाण- Crime

अकोले: पंचायत समितीच्या माजी उपसभापतीला मारहाण- Crime

Former Deputy Chairman of Panchayat Samiti beaten up crime filed

Akole | अकोले: अकोले तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड यांना घरात घुसून तिघा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथे घडली. याबाबत राजूर पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्यातील कोहंडी गावातील आरोपी शिवाजी डोळससह ३ व्यक्तींनी पिंपरकणे येथील फिर्यादीच्या राहत्या घरात घुसून मारहाण केली. पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड यांना ही मारहाण झाली. हाणामारीत मधुकर पिचड यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. मी घरात काम करीत असतानाच कोहंडी गावांतील शिवाजी डोळस व त्यांच्या दोन साथीदारांनी घरात घुसून मला मारहाण केली. याबाबत राजूर पोलिस ठाण्यात शिवाजी डोळससह तिघांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Former Deputy Chairman of Panchayat Samiti beaten up crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here