संगमनेर: बलात्कार अन सात महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद
Breaking News | Sangamner: अल्पवयीन मुलीबरोबर ओळख करून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी सात महिन्यापासून पसार आरोपी पोलिसांनी गजाआड केला आहे.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीबरोबर ओळख करून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी विनोद गडकरी याच्यावर मागील वर्षी जुलै महिन्यात तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेले सात महिने फरार असलेला आरोपी गडकरी याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विनोद दत्तात्रय गडकरी (रा. पेमगिरी ता. संगमनेर) याने अल्पवयीन मुलगी हि ०८ वी मध्ये शिक्षण घेत असताना आरोपी सोबत भाऊ ह्या नात्याने फोटो काढले होते. त्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून तुझे फोटो व्हायरल करेल असे म्हणून ती अल्पवयीन असताना तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. गुन्ह्यांतील आरोपी हा गुन्हा घडले पासून ०७ महिन्या पासून फरार होता. त्याचे शोधकामी पोलीस पथक नेमले असता पो.उप. निरीक्षक सातपुते व पो. हे. कॉ. आशिष आरवडे यांना गुप्त बातमीदारा मार्फतीने माहिती मिळाली कि, सदर आरोपी विनोद गडकरी हा सिन्नर येथे राहत असल्याची माहिती मिळून आल्याने त्यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो आज रोजी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
Web Title: Accused of raping and absconding for seven months jailed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study