अकोले अगस्ती कारखाना संचालक कैलास वाकचौरे यांचा राजीनामा कारण…
Breaking News | Akole: अगस्ती कारखाना संचालक कैलास वाकचौरे यांचा राजीनामा कारण मात्र गुलदस्त्यात.
अकोले: अकोले तालुक्यातील राजकीय खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अगस्ती कारखाना संचालक कैलास वाकचौरे यांचा संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा अगस्ती कारखान्याचे विद्यमान कार्यकारी संचालक कापडणीस यांच्याकडे सपुर्द केला आहे. राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री पिचड यांच्या विरुद्ध आमदार किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर, स्वर्गीय अशोकराव भांगरे आणि कैलासराव वाकचौरे यांनी शेतकरी समृद्ध मंडळाची स्थापना करून पिचड यांच्या विरुद्ध अगस्ती साखर कारखान्यामध्ये प्रचंड मताने विजयी मिळवून दिला होता. कैलास वाकचौरे यांची या विजयात महत्वाची भूमिका होती. कैलास वाकचौरे हे पिचड यांचे पूर्वाश्रमीचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांनी त्यांना सोडून पुन्हा राष्ट्रवादीची वाट पकडली होती. वाकचौरे यांनी पुन्हा राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यानंतर याच बोर्डातील काही संचालकही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे माहिती समजते. वाकचौरे यांच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरु असल्याचे समजते. त्यांच्या राजीनाम्याने अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे चिन्ह दिसत आहे.
Web Title: Resignation of Agasti Factory Director Kailas Wakchaure
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study