Home अहमदनगर घरात घुसून अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला सुनावली मरेपर्यंत जन्मठेप

घरात घुसून अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला सुनावली मरेपर्यंत जन्मठेप

Ahmednagar Rape Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी श्रीगोंदा सत्र न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत दोन जन्मठेपेची शिक्षा, श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल : कर्जत तालुक्यात घडली होती घटना.

Accused sentenced to life imprisonment till death in rape of minor girl 

कर्जत : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी श्रीगोंदा सत्र न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी एका वर्षातच हा निकाल दिला आहे.

छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. निर्भया घरी एकटी असताना आरोपीने तिचे तोंड दाबत तिला घरात ओढत नेऊन गप्प बस नाहीतर तोंड दाबून मारीन अशी धमकी दिली होती. ती घाबरल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर ‘याबाबत कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आई-बापाला ठार करेन’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर केला. दुसरा आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास उर्फ बबन आखाडे याने फिर्यादीस घडलेल्या प्रकाराबाबत ‘आपण आपापसात मिटवून घेऊ अन्यथा तुम्ही जर तक्रार दिली तर आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटीची खोटी तक्रार देऊ’ अशी धमकी दिली होती.

याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून २ मार्च २०१२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जत पोलिसांकडून या स्पेशल केससाठी भा. दं. वि. कलम ३७६, ५०६ लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ८, १२, केला. १७ लावण्यात आले होते. याबाबत कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलिस अण्णासाहेब जवान महादेव कोहक यांनी पाठपुरावा केला.

६ जानेवारी रोजी न्यायालयाने निकाल घोषित केला. यामध्ये आरोपी छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे यास मरेपर्यंत भादंवि ३७६ नुसार जन्मठेपेची शिक्षा, २० हजार रुपये दंड, लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायद्यान्वये भूमिका बजावली.

मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दुसरा आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे याची संशयाच्या आधारे निर्दोष सुटका केली आहे.

वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी, पोलिस ठाणे अंमलदार, पंच व चिंचोली काळदात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील संगीता अनिल ढगे यांनी काम पाहिले. फिर्यादीच्यावतीने अॅड. सुमित पाटील यांनी काम पाहून पाठपुरावा केला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस 3 पनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलिस जवान महादेव कोहक, सुनील माळशखरे, श्याम जाधव, गोवर्धन कदम, महिला पोलिस जवान आशा खामकर यांनी यासाठी महत्त्वाची बजावली.

Web Title: Accused sentenced to life imprisonment till death in rape of minor girl 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here